गोंदिया शहरातील टी.बी. टोली ग्राउंडवर दसऱ्याच्या निमित्ताने भव्य रावण दहन सोहळा संपन्न झाला. या वर्षी 101 फुट उंच रावणाचा पुतळा जाळण्यात आला तर 71 फुट उंच मेघनाथाचा पुतळाही दहन करण्यात आला. उत्सव समितीच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम रंगला आणि तामिळनाडूतील शिवकाशी येथील टीमकडून आकर्षक आतिषबाजीचे दर्शन घडवण्यात आले. तसेच रामलीला कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले, ज्यामुळे गर्दीतील उपस्थित लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.