धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जालना शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर बोऱ्हाडे हे हजारो समाजबांधवांसह मुंबईकडे जाणार होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी घेराव घालत त्यांना ताब्यात घेतले. ही माहिती समजताच धनगर समाजबांधव आक्रमक झाले असून सरकार आणि पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे.