जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीत नारीशक्तीचा अनोखा उत्सव पाहायला मिळाला. सावळाराम क्रीडा संकुल येथे सुमारे ९१११ विद्यार्थिनींनी एकत्र येत लेझीम-योगचाप व्यायामाचे भव्य प्रात्यक्षिक सादर करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हजारो विद्यार्थिनींच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्ती आणि सांस्कृतिक अभिमानाने दुमदुमून गेला. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण विभाग यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या पारंपरिक लेझीम कलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व राष्ट्रभक्तीची भावना वाढावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.