Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli Navratri: डोंबिवलीत ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने जिंकली रसिकांची मने; भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन

Dombivli Navratri: डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात बंगळुरूच्या कलावंतांनी सादर केलेल्या ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणातून आदिशक्तीचा महिमा आणि भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 18, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराचे सादरीकरण करण्यात आले
  • बंगळुरू येथील दाक्षिणात्य कलावंतांनी पारंपरिक कलाशैलीतून आदिशक्तीचा महिमा साकारला
  • नृत्य, नाट्य, अभिनय आणि भक्तिभावाच्या संगमाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले
 

आदिशक्तीचा महिमा, संस्कृतीतील समृद्ध पौराणिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ या नाट्‌याविष्काराने डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात भक्तिरसाची अनोखी अनुभूती दिली. बंगळुरू येथील दाक्षिणात्य कलावंतांनी पारंपरिक कलाशैलीतून सादर केलेल्या या प्रभावी नाट्यप्रयोगाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

नृत्य, नाट्य, अभिनय आणि भक्तिभावाचा सुरेख संगम साधणाऱ्या या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडले. अशा कलाविष्कारांच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपरांचे जतन होत असून, त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले.

Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत युतीत बिघाडीचे संकेत? प्रभाग समिती सभापतीपदासाठी १८ उमेदवारांचे अर्ज

अत्याचारातून मुक्तीसाठी महिषासुरमर्दिनीचा अवतार

महिषासुराच्या अत्याचारातून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आदिशक्ती दुर्गेने धारण केलेले महिषासुरमर्दिनीचे रूप, तिचे अद्वितीय सामर्थ्य आणि विजयाची गाथा या सादरीकरणातून प्रभावीपणे उलगडली. पारंपरिक वेशभूषा, नृत्यावी लयबद्धता, अभिनयातील सहजता आणि भवित्तपूर्ण वातावरण यामुळे नाटाडाप्रयोगाला विशेष उंची प्राप्त झाली. पौराणिक कथानकातील सामर्थ, शौर्य आणि चमविजयाचा संदेश कलात्मक अभिव्यक्तीतून साकारत कलावंतांनी उपस्थिताना भारतीय परंपरेतील सास्कृतिक मूल्याची प्रचिती दिली.

नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग, हरिपाठ, भजन

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या नवरात्रोत्सवात नवकुंडात्मक सहस्रवंडी महायाग, हरिपाठ, भजन, भक्तिसंगीत आणि विविध सास्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा जागर करण्यात येत आहे. श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती यांचा संगम घडविणाऱ्या या उत्सवात दाक्षिणात्य कलावंताच्या श्रीदेवी महिषासुरमर्दिनी नाट्याविष्काराने सास्कृतिक वैभवात भर घातली. भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणाऱ्या कलांना प्रोत्साहन देत तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

Navi Mumbai News: घणसोली एमआयडीसी परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

नाट्यविष्कारामुळे नव्या पिढीला पौराणिक परंपरेची ओळख

आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मनोरंजनावी अनेक माध्यमे उपलब्ध असतानाही पारंपरिक कलाप्रकारांनी आपले स्वतंत्र स्थान कायम राखले आहे. या कलांमध्ये केवळ मनोरंजनाची ताकद नसून, पिट्यानपढ्या जतन झालेला सांस्कृतिक वारसा, श्रद्धा आणि जीवनमूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्यही आहे. त्यामुळे अशा पारंपरिक कलांना व्यासपीठ मिळणे, कलाकारांना प्रोत्साहन मिळणे आणि या कलापरंपरांचे संवर्धन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या नाटकाविष्कारामुळे नव्या पिढीला भारतीय पौराणिक परंपरेची ओळख होण्यासोबतच आपल्या सांस्कृतिक वारशाविषयी अभिमानाची भावना दृढ होते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

  • Que:

    Ans:

Web Title: Dombivli navratri shridevi mahishasuramardini cultural program pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Dombivli
  • Navratri
  • Thane news

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन का करतात? कोणी करावा हा विधी, जाणून घ्या महत्त्व
1

Navratri 2026: नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन का करतात? कोणी करावा हा विधी, जाणून घ्या महत्त्व

Navratri 2026: नवरात्रीचा आठवा दिवस महागौरी देवीला समर्पित, कशी करावी पूजा जाणून घ्या महत्त्व
2

Navratri 2026: नवरात्रीचा आठवा दिवस महागौरी देवीला समर्पित, कशी करावी पूजा जाणून घ्या महत्त्व

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
3

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला
4

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.