शहाड रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दोन दिवसांपूर्वी एका वयोवृद्ध महिलेला अपघाताचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज महापालिकेविरोधात जोरदार आंदोलन छेडले. मनसे पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्ष आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरत, तातडीने उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली.