शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन संभाजी भिडे गुरुजींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. मात्र शाहीर दिलीप सावंत यांच्याकडून भिडे गुरुजींबद्दल बोलताना आक्षेपार्ह विधान झालं. त्यामुळे भिडे गुरुजी यांच्या समर्थकांनी शाहीर दिलीप सावंत यांना सोशल मीडियावरून घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे.यानंतर शाहीर दिलीप सावंत यांच्या घराला पोलिसांनी बंदोबस्त दिला आहे.ज्या परिसरामध्ये शाहीर दिलीप सावंत राहतात त्या पूर्ण चौकामध्ये आणि घराच्या परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कारण भिडे गुरुजी यांच्या समर्थकाने धमकी देताना धारकरी यांना देखील एकत्र जमण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे..त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मात्र अशा धमकीला आम्ही घाबरत नाही हे कोल्हापूर आहे आणि शिवाजी पेठेत असली धमकी चालत नाही असं प्रत्युत्तर मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक यांनी दिलं आहे.