लातूर शहर भाजपामध्ये तिकीट वाटपावरून तीव्र नाराजीचा स्फोट झाला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकावले आहे. जनसंघापासून काम करणारे व आरएसएसशी संबंधित जुने कार्यकर्ते कल्पतरू मंगल कार्यालयात एकत्र येत निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला. “भाजप टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्हीच लढा देणार,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला असून, या नाराजीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.