Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडलेल्या असताना आता सर्वच ग्रामपंचायतची मुदत दोन तीन दिवसात संपणार आहे. स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 02:35 PM
स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात
Follow Us
Follow Us:
  • स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध
  • गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात
  • ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार
शिक्रापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडलेल्या असताना आता सर्वच ग्रामपंचायतची मुदत दोन तीन दिवसात संपणार आहे. स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. महाराष्ट्रात अनेक निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या होत्या. नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडल्या आहेत. आता लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

 

येत्या २ ते ३ दिवसात राज्यातील अनेक ग्रामपंचायतची मुदत संपणार आहे. शिरुर तालुक्यातील देखील ७१ ग्रामपंचायतची मुदत संपणार आहे, मात्र अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी मे महिन्यात पावसाळया पूर्वी ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर अनेक गावांमध्ये बैठका सुरु होत आहेत. नुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतचे वेध लागले असतांना अनेकांनी गावामध्ये युवकांना एकत्र करत आपापल्या नावाचा प्रचार करत सोशल मिडीयावर वेगवेगळ्या पोस्ट टाकून स्थानिकांना आपण निवडणूक लढवणार असल्याचा इशाराच दिला आहे.

तर पराभूत उमेदवार स्थानिक पातळीवर काय निर्णय घेणार व गावामध्ये काय बदल घडवणार हे पाहणे गरजेचे आहे, तर यापूर्वी वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे घेऊन एकमेका विरोधात लढलेले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काय भूमिका घेणार पुढील गणिते स्पष्ट होणार आहे, तर सध्या जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी अनेक इच्छुकांनी मतदारांना आखाडाची ढेकर व देवदर्शन घडवले असताना ग्रामपंचायतचे इच्छुक कोणती योजना आखणार याकडे देखील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सात ग्रामपंचायतची मुदत संपली

शिरुर तालुक्यातील यापूर्वी धानोरे, कासारी, ढोकसांगवी, कळवंतवाडी, करडे, आंबळे व चव्हाणवाडी या सात ग्रामपंचायतची मुदत संपली आहे. या ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आलेले असून, नव्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा : पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

७१ ग्रामपंचायतची मुदत संपणार

शिरुर तालुक्यात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आलेगाव पागा, आपटी, उरळगाव, करंदी, केंदूर, कोरेगाव भीमा, खैरेनगर, खैरेवाडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, टाकळी भिमा, डिंग्रजवाडी, तळेगाव ढमढेरे, दरेकरवाडी, दहिवडी, धामारी, निमगाव म्हाळुंगी, पाबळ, पारोडी, पिंपळे जगताप, भांबर्डे, मुखई, वढू बुद्रुक, वाडा पुनर्वसन, विठ्ठलवाडी, शिक्रापूर, सणसवाडी, हिवरे, आमदाबाद, कवठे येमाई, कान्हूर मेसाई, कारेगाव, कोंढापुरी, खंडाळे, गणेगाव खालचा, चांडोह, मोराची चिंचोली, निमगाव भोगी, निमगाव दुडे, पिंपळे खालसा, पिंपरखेड, पिंपरी दुमाला, फाकटे, बाभुळसर खुर्द, बुरुंजवाडी, मलठण, मिडगुलवाडी, रावडेवाडी, वडनेर खुर्द, वरुडे, वाघाळे, सविंदने, आंधळगाव, इनामगाव, कुरुळी, कोळगाव डोळस, गणेगाव दुमाला, गुनाट, गोलेगाव, नागरगाव, चिंचणी, निमोणे, निर्वी, न्हावरा, पिंपळसूटी, बाभुळसर बुद्रुक, मोटेवाडी, वडगाव रासाई, शिंदोडी, शिरसगाव काटा व सादलगाव या ७१ ग्रामपंचायतची मुदत संपणार आहे.

Web Title: Vigorous campaigning is underway by aspirants for the gram panchayat elections in shirur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Election News
  • gram panchayat
  • maharashtra

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
2

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
3

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.