शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात सरकारने नुकताच एक शासन निर्णय काढला आहे. मात्र, हा निर्णय शेतकऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे नसल्याचा आरोप करत छावा संघटनेने त्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूर येथे आज या शासननिर्णयाची जाहीरपणे होळी करून आपला संताप व्यक्त केला.आम्हाला हा जीआर मान्य नाही, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे,असा आरोप छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.शेतकऱ्यांच्या अडचणींकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी विजय कवाळे यांनी