अंतर मशागतीचा खर्च परवडत नसल्याने स्वतःला औताला जुंपून घेत शेतात कोळपणी करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार यांना आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बैलजोडी देण्यात आली. आज दुपारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावात येत शेतकरी अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार यांची भेट घेत बैलजोडी सुपूर्द केली. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या सूचनेवरून लातूर जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी जमा करीत पाऊण लाखांची बैल जोडी खरेदी केली आणि ती पवार दांपत्याला दिली. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्या सोडविण्याची मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली तर, बैलजोडी मिळाल्यानंतर शेतकरी पवार दांपत्याने समाधान व्यक्त केले.. तसेच आम्हाला जशी मदत केली त्याचप्रमाणे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी पवार दांपत्याने यावेळी केली आहे.