उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या ३० अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले आहे. काही ठिकाणी याचा जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलं. तर, काही ठिकाणी या निर्णयाला विरोध दर्शवला जात आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ३० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.