भाजपची सत्ता उलथवून टाकत राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांनी जोरदार राजकीय चाल खेळली. या घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील सत्तासमीकरणेच बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
झेडपी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज बुधवारी दुपारी तीन वाजता संपणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर येत असून परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती देण्यात आली. एकंदरीत मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीला यश मिळाले आहे.
सांगली जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट लिहून त्याने शाळेतील छळाचा उल्लेख केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने करण्यात याव्यात याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सूचना दिल्या.
कल्याण ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम मनसेने राबवला. या उपक्रमाचे आयोजन मनसेचे पदाधिकारी तकदीर काळण यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने कुऱ्हाडीने वार करून पतीची हत्या केली. लग्नाच्या अवघ्या १७ दिवसांत ही घटना घडली.
मिरज येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी एका अज्ञात महिलेने तीन दिवसाच्या नवजात बाळाला पळवून नेले. सीसीटीव्ही मध्ये महिला कैद झाली असून पोलीस शोध…
सांगलीला मंत्रिपद मिळाले नसल्याने पालकमंत्री दुसऱ्यांदा बाहेरचा पालकमंत्री होणार आहे. तर साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई व कोल्हापुरातून हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाले आहे.
विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटून घेत होते. ही बातमी जनतेला समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे पैसे घेऊन अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.