येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाच्या वतीने माजी महापौर तथा उमेदवार हसमुख गहलोत यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ढोल-ताशांच्या गजरात, भाजपाचे झेंडे हाती घेऊन कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी प्रभाग १२ मधील भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान बोलताना माजी महापौर हसमुख गहलोत यांनी, “मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर यावेळी भाजपाचाच महापौर विराजमान होणार आहे. सोळा तारखेला भाजपाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.