Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Kejriwal Live : “हे या दोघांचं षडयंत्र, मोदी आणि शहांनी देशाची माफी मागावी; अरविंद केजरीवालांचा BJP वर संशय

दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर सर्व आरोपींना कथित दारू धोरण घोटाळ्यातील दोषमुक्त केले. यानंतर त्यांनी भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2026 | 05:17 PM
After Arvind Kejriwal's acquittal, allegations that the alleged liquor scam case is a BJP conspiracy

After Arvind Kejriwal's acquittal, allegations that the alleged liquor scam case is a BJP conspiracy

Follow Us
Follow Us:
  • अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता
  • ही केस मोठं राजकीय षडयंत्र
  • पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांनी माफी मागावी
Arvind Kejriwal Live : नवी दिल्ली : आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली मद्य घोटाळ्यामधून अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या आरोपांमुळे जेलमध्ये जावे लागल्याने आणि मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच हे षडयंत्र असून हे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री शहा यांनी केले असल्याचा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर सर्व आरोपींना कथित दारू धोरण घोटाळ्यातील दोषमुक्त केले. तसेच आरोपींविरुद्ध सीबीआयच्या आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाने नकार दिला. अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. केजरीवाल म्हणाले की, “हा खटला पूर्णपणे बनावट आहे. हे एक षडयंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आम आदमी पक्षाला नष्ट करण्यासाठी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा राजकीय षड्यंत्र रचण्याचा एकत्रित कट रचला आहे,” असा आरोप केजरीवाल यांनी केला.

हे देखील वाचा : मी आजारी नव्हतो तर…! राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य

पुढे ते म्हणाले की, “आम आदमी पक्षाच्या पाच प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. एका विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या घरातून अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले, जे भारतीय इतिहासात कधीही घडले नाही. हे अमित शहा यांनी रचलेले सर्वात मोठे राजकीय षड्यंत्र आहे. पक्षातील अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे, जे लोकशाहीसाठी चिंतेचा विषय आहे. सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जवळजवळ दोन वर्षे तुरुंगात घालवली. प्रतिमा मलिन करण्यासाठी चिखलफेक करण्यात आली. टीव्ही चॅनेलवर त्यांना सतत भ्रष्ट म्हणून दाखवण्यात आले,” असा आरोप केजरीवाल यांनी सत्ताधारी भाजपवर केला आहे.

हे देखील वाचा : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा

पुढे ते म्हणाले की, “२०२२-२३ च्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणापासून संपूर्ण प्रकरण सुरू झाले, ज्यामध्ये सीबीआय आणि ईडीने मनी लाँड्रिंग आणि फसवणुकीचे आरोप दाखल केले. या प्रकरणात अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की संवैधानिक अधिकाऱ्यांवर आरोप करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत; केवळ दाव्यांवर खटला उभारता येत नाही,” असा टोला देखील आप नेते अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.

Web Title: Arvind kejriwals acquittal allegations that the alleged liquor scam case is a bjp conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • AAP Arvind Kejriwal
  • narendra modi
  • political news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.