भाईंदरमध्ये मनसेच्या विशेष कार्यक्रमात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “सदावर्ते कुठेही भेटले, तर त्यांचा चष्मा काढून थेट त्यांच्या गुडघ्यावर ठेवीन,” असा थेट इशाराच त्यांनी दिला. या कार्यक्रमात मुंबईतील विविध भागांतून आलेल्या हिंदी भाषिक नागरिकांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी जाधव यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर नव्हे तर मैदानात उतरून मातृभाषेसाठी लढा द्यावा, असा ठाम संदेशही त्यांनी दिला.