नवी मुंबईतील बेलापूरमध्ये प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेवरून वाद निर्माण झाला असून, या प्रकरणात आता न्यायालयाचे लक्ष वेधले गेले आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे रुग्णालयासाठी प्रयत्नशील असताना, नागरिक मात्र त्या जागेवर खेळाचे मैदान असावे, अशी मागणी करत आहेत. या वादग्रस्त जागेसंदर्भात दाखल याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली असून, कोर्टाने जिल्हाधिकारी आणि महापालिकेला नोटीस बजावली आहे. तसेच, संबंधित जागा सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने ४ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयीन टप्प्यावर पोहोचला आहे.