Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

कोरडगावात रात्रीच्या वेळी रस्ता चुकलेली कार रिव्हर्स घेताना अचानक पाटाच्या पाण्यात कोसळली. या घटनेत शेख दाम्पत्य बेपत्ता झाले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 25, 2026 | 08:10 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • चुकीचा रिव्हर्स बेतला जीवावर
  • कार अचानक कोसळली पाटाच्या पाण्यात
  • शेख दाम्पत्य बेपत्ता
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे राहणाऱ्या शेख कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोमवारी रात्री पैठण तालुक्यातील चांगतपुरी फाट्याजवळ रस्ता चुकलेल्या कारने रिव्हर्स घेताना जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत पती-पत्नी आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला एक तरुण असे तिघे पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बेपत्ता झालेल्यांमध्ये मुकीद अहमद शेख (वय ३५) आणि निलोफर मुकीद शेख (वय ३०), रा. कोरडगाव (ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे. त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेले रावसाहेब खडेकर (रा. चांगतपुरी) हे देखील बेपत्ता असल्याची माहिती आहे.

Ahilyanagar News: शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांसाठी अकोलेहून अहिल्यानगरकडे लाल वादळाची कूच; 148 किमी पायी मोर्चा

चालक बचावला

या अपघातात कार चालक अल्ताफ पठाण यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ कारमधून बाहेर पडल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र कारमधील शेख दाम्पत्य आणि त्यांना मदत करण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला तरुण कालव्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, शेख दाम्पत्य कार (क्र. एमएच १२ केजे ९०३२)ने पिंपळवाडीच्या दिशेने जात होते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास चांगतपुरी येथील चांगदेव विद्यालयाजवळ चालकाकडून रस्ता चुकला. अंधार आणि गोंधळाच्या परिस्थितीत कार मागे घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खोल कालव्यात कोसळले.

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

सध्या Jayakwadi Dam येथून कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने प्रवाह अत्यंत वेगवान असल्याचे सांगितले जात आहे.

शोधमोहीम सुरू

घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. मात्र बेपत्ता तिघांचा शोध रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेची वार्ता समजताच कोरडगाव व परिसरावर शोककळा पसरली असून, संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ahilyanagar news paithan canal accident couple and youth missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jalgaon Crime News : अघोरी कृत्ये अन् मोठी लूट! फरार भोंदू बाबाला कधी पकडणार? पीडितांचा सवाल
1

Jalgaon Crime News : अघोरी कृत्ये अन् मोठी लूट! फरार भोंदू बाबाला कधी पकडणार? पीडितांचा सवाल

Solapur News : एलपीजी दरकपातीसाठी सोलापूरचे रिक्षाचालक रस्त्यावर; ‘सोलापूर बंद’चा इशारा
2

Solapur News : एलपीजी दरकपातीसाठी सोलापूरचे रिक्षाचालक रस्त्यावर; ‘सोलापूर बंद’चा इशारा

Parbhani : पडेगावात पुतळ्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! 35जण पोलिसांच्या ताब्यात 
3

Parbhani : पडेगावात पुतळ्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! 35जण पोलिसांच्या ताब्यात 

Ulhasanagar : स्थायी समिती सभापतीपदी कलवंत सिंग सहोता यांची निवड निश्चित?
4

Ulhasanagar : स्थायी समिती सभापतीपदी कलवंत सिंग सहोता यांची निवड निश्चित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.