पनवेल ग्रामीण वाढत्या नागरिकीकरणामुळे पालिका हद्दीत अतिरिक्त पाण्याची गरज आहे.पाण्याची ही गरज भागविण्यासाठी पनवेल पालिकेकडून कुंडलिका नदीवरील डोलवहाल बंधाऱ्यातून ५०० दक्षलक्ष प्रतिदिन पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता, जलसंपदा विभागाकडे दिला आहे.पालिकेने दिलेल्या या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे. पुढे पाटील असंही म्हणाले की, भविष्यात पनवेल भागात पाण्याची वाढणारी गरज लक्षात घेत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा. सिडकोच्या प्रस्तावित कोणत्याही धरणात पनवेल महापालिकेला आरक्षण नाही. त्यामुळे पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी विधनपरिषदेत केली आहे.