पाथरी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. भाजपा पाथरी नगरपालिका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पाथरी नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष व अन्य नगरसेवक पदासाठी इच्छुकानी उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्मस दिला नाही आणि त्यामुळे या सर्वच उमेदवाराचे उमेदवारी अर्ज रद्द झाले. त्यामुळे पाथरी भाजप संघटनेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सुरेश भुमरे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची थेट मागणी करण्यात आली.