Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS च्या शताब्दी वर्षात ‘शतक’ चित्रपटाची चर्चा; डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याला मोहन भागवत यांची मानवंदना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘शतक’ या चित्रपटाचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे. मोहन भागवत यांनी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याला मानवंदना दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 18, 2026 | 08:42 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Mohan Bhagwat यांनी ‘शतक’ चित्रपटाचे केले कौतुक
  • चित्रपटात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना मानवंदना
  • ‘शतक’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकार होत असलेल्या ‘शतक’ या चित्रपटाबाबत देशभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नवी दिल्लीतील केशव कुंज येथे आयोजित विशेष कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चित्रपटाविषयी मनोगत व्यक्त करत त्याला केवळ एक चित्रपट नव्हे, तर एका वैचारिक आणि राष्ट्रीय प्रवासाचे जिवंत चित्रण असे संबोधले आहे.

”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, राष्ट्रसंघटन, सामाजिक जागृती आणि शिस्तबद्ध संघटन उभारणीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्याग, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची प्रेरणा आजही लाखो स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत आहे, असेही ते म्हणाले आहेत.

‘शतक’ या चित्रपटाद्वारे डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंग प्रभावीपणे पडद्यावर साकारण्यात आले आहेत. विशेषतः चित्रपटातील एका गीतातून त्यांच्या बालपणातील हृदयस्पर्शी प्रसंग सादर करण्यात आला असून, त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दृढ निश्चय, राष्ट्रभक्ती आणि नेतृत्वगुण कसे विकसित झाले याचे भावनिक चित्रण करण्यात आले आहे. या दृश्यांमुळे प्रेक्षकांना त्यांच्या जीवनप्रवासाची जवळून ओळख होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण तांत्रिक टीमचे अभिनंदन करत भागवत यांनी या प्रयत्नाला शताब्दी वर्षाला साजेसा सांस्कृतिक अभिवादन असे म्हटले. संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा मागोवा घेत, त्याच्या वैचारिक पायाभूत तत्त्वांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केली आहे. आरएसएसच्या शताब्दी वर्षाला समर्पित असलेला ‘शतक’ हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारी रोजी संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संघाच्या विचारधारेचा आणि इतिहासाचा मागोवा घेऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा एक महत्त्वाचा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Web Title: Shatak brings to life the inspiring journey of dr hedgewar ji rss chief mohan bhagwat ji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
1

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
2

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
3

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
4

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.