VIDEO | खरीप हंगामासाठी कृषी मंत्र्यांची पत्रकार परिषद
खरीप हंगामासाठी तसेच अन्य शेती विषयक,
खते उपलब्धता तसेच पिका विमा बाबत आज कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली. खरीप हंगामाचे क्षेत्र १ कोटी ४५ लक्ष हे. आहे. येत्या खरीप हंगाम २०२२ साठी एकूण ५२ लक्ष मे.टन खतांची मागणी केली आहे यामध्ये युरिया, डिएपी, एसओपी, NPK, SSP यांचा समावेश आहे. तसेच खरीप हंगामात सोयाबीन सोयाबीन व कापूस पिकाचे ८५ लक्ष क्षेत्र आहे. त्यासाठी पेरणीच्या वेळीच खते द्यावी लागतात. केंद्र सरकारने ४५ लक्ष मे.टन आवंटन मंजूर केले आहे. मंजूर आवटंन वाढवावे व आवटंनानुसार प्रामुख्याने एप्रिल, मे, जून मध्ये खते उपलब्ध व्हावे यासाठी विनंती केली. अशी माहित कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.