पुणे: राज्यात गाजत असलेल्या थकीत एफआरपी प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे न राहता कारखानदारांची पाठराखण करत आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. एफआरपीचे तुकडे करण्याच्या निर्णयावरून न्यायालयाने सरकारला यापूर्वीच फटकारले आहे. तरीही सरकार न्यायालयात शेतकऱ्यांऐवजी कारखानदारांची बाजू सावरत असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. ज्या कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे, त्यांच्यावर तात्काळ आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.