सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथे शक्तीपीठ महामार्गाविरोधात बाधित शेतकऱ्यांचा तिरंगा मेळावा पार पडला. “शक्तीपीठ नको माझ्या वावरात” आणि “तिरंगा फडकतो आमच्या शिवारात” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात एल्गार केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत मोजण्या तात्काळ थांबवाव्यात, अन्यथा कलेक्टर ऑफिसलाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी प्रशासनाने जबरदस्तीने सुरू केलेल्या मोजण्यांना शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असून, आता राज्यातील १२ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी एकत्र येऊन मोठ्या आंदोलनाची तयारी करत आहेत.