Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News: तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर; राज्यभरातील २० संघांचा अभिनयाचा महासंग्राम

ही दोन दिवसीय नाट्यमेळा सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत साने गुरुजी नाट्यगृह येथे रंगणार आहे. सामाजिक आशय मांडणाऱ्या एकांकिकांपासून ते निखळ मनोरंजन देणाऱ्या प्रयोगांपर्यंत विविधतेचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 14, 2026 | 09:41 AM
Sangali News: तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर; राज्यभरातील २० संघांचा अभिनयाचा महासंग्राम
Follow Us
Follow Us:
  • आर. आर. (आबा) पाटील स्मृती करंडक २०२६’ हा राज्यस्तरीय एकांकिका महोत्सवाला आजपासून सुरुवात
  • संपूर्ण महाराष्ट्रातील २० दर्जेदार नाट्यसंघ अभिनयाची पराकाष्ठा सादर करण्यासाठी सज्ज
  • आबांच्या नावाने सुरू झालेली ही स्पर्धा सांगली जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा
 Sangli Tasgaon News: तासगावच्या सांस्कृतिक परंपरेत भर घालणारा रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच ‘आर. आर. (आबा) पाटील स्मृती करंडक २०२६’ हा राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव आजपासून १४ पासू सुरू होत आहे. हा महोत्सव १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी रंगणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातील २० दर्जेदार नाट्यसंघ अभिनयाची पराकाष्ठा सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘आर्यरुप नाट्यनिर्मिती थिएटर्स’ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आबांच्या स्मृतींना कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो अर्जांमधून निवडक २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरांतील नामांकित नाट्यसंस्था तासगावात दाखल होत आहेत. त्यामुळे यंदाचा स्मृती करंडक कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ही दोन दिवसीय नाट्यमेळा सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत साने गुरुजी नाट्यगृह येथे रंगणार आहे. सामाजिक आशय मांडणाऱ्या एकांकिकांपासून ते निखळ मनोरंजन देणाऱ्या प्रयोगांपर्यंत विविधतेचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. आयोजकांच्या मते, कलेवर प्रेम करणाऱ्या आबांच्या स्मृती जपणं आणि नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तासगावकरांनी या नाट्यमहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या

लोकनेते आबांच्या नावाने सुरू झालेली ही स्पर्धा सांगली जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा ठरत आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी राज्यभरातील युवा कलाकारांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूसाठी आकर्षक बक्षिसे देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सलग दोन दिवस रंगणारा हा नाट्यमहोत्सव तासगावच्या रंगभूमीला नवे सांस्कृतिक आयाम देणार, यात शंका नाही.

Web Title: Sangali news two day theatre festival in sangli on the occasion of r r aaba memorial trophy 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Marathi News
  • RR Patil
  • Sangali News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.