सांगलीतील कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वाढ होऊन ती 43 फुटांपर्यंत वाढली आहे. यामुळे नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून कृष्णेच्या तीरावर असणाऱ्या मगरमच्छ कॉलनीमध्ये काही ठिकाणी पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश होऊनही काही नागरिक अजूनही घरामध्ये वास्तव्यास आहेत. या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्या स्वाती शिंदे आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी बाधितक्षेत्राला भेटी दिल्या. यावेळी ज्या ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेला आहे अशा नागरिकांच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर नैसर्गिक नाल्यांमध्ये झालेले बेकायदेशीर बांधकामे काढून टाकण्यात यावीत. यामुळेही पूर येत असल्याचे सांगत. शेरी नाला हा बंदिस्त करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.