पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक 5 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. मात्र या दिवशी महाराष्ट्रातील भक्तगणांचे दैवत असणाऱ्या चिंचलीच्या मायाक्का देवीची यात्रा असल्याने यासाठी महाराष्ट्रातील लाखो भाविक या यात्रेसाठी जात असतात. त्यामुळे याचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होऊ शकतो. शिवाय मतदारही मतदान प्रक्रियेपासून दूर राहू शकतात, त्यामुळे निवडणूक आयोगाने ताबडतोब जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तारीख बदलावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास न्यायालयामध्ये दाद मागण्याचा इशाराही प्रशांत सदामते यांनी दिलाय.