Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Highway : महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही; तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

सरकारच्या या महामार्ग प्रकल्पावर शेतकऱ्यांकडून कायमच तीव्र विरोध केला आहे. अशातच आता शक्तिपीठ महामार्गासाठी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांची एक इंचही जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार बळीराजाने केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 28, 2026 | 12:47 PM
Shaktipeeth Highway : महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही; तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:
  • महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही
  • तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
सांगली : गेले कित्येक दिवस शक्तीपीठ महामार्गाबाबतचा प्रश्न अद्याप ऐरणीवर आहे.  सरकारच्या या महामार्ग प्रकल्पावर शेतकऱ्यांकडून कायमच तीव्र विरोध केला आहे. अशातच आता शक्तिपीठ महामार्गासाठी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांची एक इंचही जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार आज शुक्रवारी येथे तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चात करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, माजी खा. राजू शेट्टी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील यांच्या सह विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. आंदोलन स्थळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, संघटित विरोध उभा करून हा महामार्ग रद्द होईपर्यंत आपण गप्प बसणार नाही. सुपीक शेती उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प शेतकरी कदापि सहन करणार नाही.

मांच्या बाजारातून सत्ता मिळविण्यासाठी महामार्गाचा धंदा सुरू माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले, मागणी नसताना शेतकऱ्यांवर लादला जाणारा हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना दिलेला सरळ त्रास आहे. वाळवा तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी शेकडो एकर सुपीक जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. ही जमीन उस, सोयाबीन, भात, गहू, भुईमूग यांसारखी हमखास उत्पादन देणारी आहे.

आमची एकच जिद्द… शक्तिपीठ महामार्ग रद्द…
शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती स्थापन करून बेमुदत आंदोलन छेडणार असून आमच्या सुपिक जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न झाला तर सरकारला सळो की पळो करून सोडू.. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अन्याय सहन करणार नाही. क्रांतिकारकांच्या भूमीतून पत्री सरकारच्या परंपरेप्रमाणे तीव्र प्रतिकार उभा केला जाईल.

Vegetable price News : गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?

बापूंना अभिवादन करून मोर्चाला झाली सुरुवात
मोर्चाचे नियोजन प्रा. सुहास पाटील, दीपक कोठावळे, उमेश कुरळपकर, भागवत जाधव, अजित हवालदार, प्रवीण पाटील, रणजीत चव्हाण, विजय महाडिक व सर्व सहकाऱ्यांनी केले. पंचायत समिती, इस्लामपूर येथे क्रांतिसिंह नाना पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. भर उन्हात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला व तेथे सभेत रूपातर झाले.

Kolhapur News : “केएमटी बसेसना चांगले दिवस नक्कीच आणू”; रोहन अतिग्रे यांचं आश्वासन

Web Title: Sangali shaktipeeth will not give even an inch of land for the highway farmers march at the tehsildars office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Sangali News
  • Shaktipeeth Highway News

संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीत मोठे बदल
1

Pimpri-Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीत मोठे बदल

Satara : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोयना जलाशयातल्या पुलांच्या कामांची केली पाहणी
2

Satara : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोयना जलाशयातल्या पुलांच्या कामांची केली पाहणी

Naigaon : नायगावमध्ये विकासकामांवरून बविआ आणि भाजपात श्रेयवादाची लढाई!
3

Naigaon : नायगावमध्ये विकासकामांवरून बविआ आणि भाजपात श्रेयवादाची लढाई!

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
4

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.