Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : प्रदुषणामुळे नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात

कारखान्याच्या डिस्टलरीतून रसायन मिश्रित 'स्पेन्ट वॉश' पाणी थेट कृष्णा नदीपात्रात सोडण्यात आल्याने बोरगाव ते जुनेखेड या तब्बल २० किलोमीटर परिसरात लाखो मासे मृत झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 28, 2026 | 05:56 PM
Sangali News : प्रदुषणामुळे नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात
Follow Us
Follow Us:
  • प्रदुषणामुळे नदीत मृत माशांचा खच
  • रसायन मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात
सांगली : कारखान्याच्या डिस्टलरीतून रसायन मिश्रित ‘स्पेन्ट वॉश’ पाणी थेट कृष्णा नदीपात्रात सोडण्यात आल्याने बोरगाव ते जुनेखेड या तब्बल २० किलोमीटर परिसरात लाखो मासे मृत झाले आहेत. नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचा खच साचल्याने पाण्यावर तवंग जमा झाला आहे. परिणामी नदीतील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने घटले असून जैवविविधतेवर घाला घालण्यात आला आहे. नदीपात्रातून तीव्र दुर्गंधी पसरली असून नदीकाठावरील गावांतील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सकाळी नदीवर अंघोळीला गेलेल्या नागरिकांना मृत माशांचे थर दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिण्याचे पाणीही दूषित आजारांचा धोका वाढला.

कृष्णा नदीवर२० गावांना फटका; संताप उसळला
या दूषित पाण्याचा फटका बोरगाव, बनेवाडी, गौडवाडी, साटपेवाडी, मसुचीवाडी, ताकारी, दुधारी, रेठरे हरणाक्ष, तुपारी, जुनेखेड, पुनदी यासह सुमारे २० गावांना बसला आहे. शेतकरी, नागरिक वा ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष; दोषींवर कारवाई केव्हा?हा प्रकार घडूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण व प्रशासनाकडून तातडीची ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच असे प्रकार घडत असूनही कारखानदारांवर कठोर कारवाई होत नसल्याने प्रदूषण माफियांचे फावत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात असे प्रकार जाणीवपूर्वक घडतात
66 पाणी नदीत सोडत्यामुळेच हा हत्याकाड घडला आहे साखर कारखान्याच्या डिस्टलरीतील ‘स्पेन्ट वॉश’ दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात. डिस्टलरीला ‘शून्य पाणी विसर्ग’ अटीवर परवाना दिला असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषी कारखान्याचा शोध घेऊन तातडीने कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. हेच दूषित पाणी नागरिक, जनावरे आणि शेतीसाठी वापरले जात असल्याने परिस्थिती अत्यंत भयावह आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

Vegetable price News : गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?

दूषित पाण्यातील मासे खाणे आरोग्यासाठी घातक
कृष्णा नदीत रसायनयुक्त सांडपाणी मिसळल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. या प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. अशा दूषित पाण्यातील मासे खाणे अत्यंत घोकादायक आहे. त्यामुळे विषबाधा, उलटी, जुलाब, पोटदुखी, त्वचारोग व गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नदीतून पकडलेले है मासे खाऊ नयेत. नागरिकांनीही स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी.
वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, ईश्वरपूर

नागरिकांच्या ठळक मागण्या काय ?
कृष्णा नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी.
नदीपात्रात रात्रीच्या वेळी होत असलेल्या बेकायदेशीर सांडपाणी विसर्जनावर कायमस्वरूपी बंदी घालावी.
पाण्याचे तातडीने प्रयोगशाळा परीक्षण करून अहवाल जाहीर करावा.
नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन औषधोपचार व जनजागृती करावी.
भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून कायमस्वरूपी देखरेख पथक व सीसीटीव्ह यंत्रणा बसवावी.
नदी प्रदूषणास आळा घालण्यासाठी प्रभावी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (STP) कार्यान्विता करावीत.अशा नागरिकांनी मागण्या केल्या आहेत.

Shaktipeeth Highway : महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही; तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

Web Title: Dead fish litter in krishna river due to pollution chemical contaminated water endangers citizens health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.