तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यभरातील बहिणी खुश झाल्या होत्या. त्यातीलच एक बहीण म्हणजे सांगलीची स्टेला सुधाकर गायकवाड. जिने स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र मोडून त्याची राखी बनवून एकनाथ शिंदे यांना पाठवली होती. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी तिचे खूप कौतुक ही केले होते. अशा स्टेला गायकवाडने जेव्हा प्रत्यक्षात महानगर पालिकेची उमेदवारी मागितली तेव्हा मात्र सुरुवातीला होकार दिला पण नंतर तिला शेवटपर्यंत झुलवत ठेवले. AB फॉर्म देतो म्हणून तिला थांबवून ठेवले. हा डाव लक्षात आल्यावर तिने सरळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संपर्क साधला. आणि प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारी मिळवली. उबाठा सेनेकडून जरी पैसे मिळत नसले तरी, तेच खरे बहिणीचे भाऊ आहेत. त्यांची ऋणी असल्याची भावना स्टेला गायकवाड यांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली.