Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

नेवाशात जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे खोट्या वारसनोंदी लावून जमीन नावावर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधित नेवाशात दोन सेतूचालकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 08:24 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

नेवासा येथे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या वारसनोंदी लावून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी Newasa Police Station येथे सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोजेस संजय जाधव (रा. नेवासे खुर्द) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नेवासे बुद्रुक शिवारात त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित 21 एकर 17 गुंठे शेती असून ती पणजोबा केरू भगवंता जाधव (मृत) यांच्या नावावर आहे. फिर्यादीचे आजोबा आणि चुलत आजोबा कामानिमित्त बाहेरगावी राहत होते. तसेच वडील संजय मधुकर जाधव (मृत) हेही बाहेरगावी असल्यामुळे या जमिनीची वारस नोंद वेळेत घेता आली नव्हती.

फेब्रुवारी 2026 मध्ये मोबाईलवरील ऑनलाईन अ‍ॅपद्वारे शेत गट उतारा तपासला असता त्या जमिनीच्या गट क्रमांकावर शरद पिटर जाधव आणि प्रमिला भोसले यांची नावे नोंद झाल्याचे दिसून आले. याबाबत तलाठी कार्यालयात चौकशी केली असता ई-फेरफारमधील कागदपत्रे तपासताना सचिन रतन धोंगडे (नेवासे बुद्रुक) आणि संदीप आप्पासाहेब मुठे (मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर, सध्या नेवासे तहसीलसमोर सेतूचालक) यांनी संगनमत करून खोटे वारस प्रतिज्ञापत्र तयार करून बनावट वारस दाखले तयार केल्याचे उघड झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज आहिरे करत आहेत.

सह्या-शिक्क्यांसह बनावट कागदपत्रे

या प्रकरणात सहा जणांची बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार करण्यात आली होती. तसेच खोटे वारस दाखले आणि वारस नोंद प्रतिज्ञापत्र तयार केल्याचे आढळून आले. ग्रामपंचायतसह संबंधित कार्यालयांनी या सर्व प्रमाणपत्रे बनावट असल्याचा अहवाल दिला आहे. सरपंच, पोलिस पाटील आणि सोसायटी चेअरमन यांच्या सह्या व शिक्क्यांचीही बनावट नक्कल करून वारस दाखले तयार करण्यात आले.

दुय्यम निबंधकांसमोर खोटे वारसदार

दुय्यम निबंधकांसमोर शरद पिटर जाधव आणि प्रमिला सचिन भोसले या दोघांना खोटे वारसदार म्हणून उभे करून खरेदीखत करण्यात आले. या व्यवहारात साक्षीदार म्हणून सेतूचालक सचिन धोंगडे आणि संदीप मुठे यांच्या सह्या असल्याचेही समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे.

विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

यांच्याविरोधात गुन्हा

या प्रकरणी खालील सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • सचिन रतन धोंगडे (रा. नेवासे बुद्रुक)
  • संदीप आप्पासाहेब मुठे (मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर)
  • शरद पिटर जाधव (नेवासे बुद्रुक)
  • प्रमिला सचिन भोसले (पिंपरी चिंचवड)
  • संजय विष्णु भगत (साईनाथनगर, ता. नेवासे)
  • मीना सतीश जाधव (रा. आरडगाव, ता. राहुरी)

Web Title: 21 acres of land was grabbed through fraud case registered in nevasa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahmednagar Crime
  • Marathi News

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.