Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

जागतिक महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून, समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या स्त्रियांच्या संघर्षाचा आणि यशाचा सन्मान आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 07, 2026 | 06:37 PM
International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास
Follow Us
Follow Us:
  • कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत;
  • डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास
नीता परब : जागतिक महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून, समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या स्त्रियांच्या संघर्षाचा आणि यशाचा सन्मान आहे. अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय म्हणजे डॉ. बबिता कमलापूरकर, ज्या मागील २६ वर्षांपासून शासकीय सेवेत अविरत कार्यरत आहेत. डॉक्टर होतानाच त्यांनी समाजासाठी उत्कृष्ट कार्य करण्याचा संकल्प केला होता आणि तो त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सिद्ध करून दाखवला आहे. आरोग्य विभागाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या डॉ. कमलापूरकर यांनी सन २००० ते २००३ या कालावधीत राज्यात सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम प्रस्थापित केला, ज्याची दखल घेत तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला होता. केवळ हेच नव्हे, तर २००५ मध्ये कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रमाचे उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केल्याबद्दल त्यांना तत्कालीन आरोग्य मंत्र्यांकडून सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ जिल्हास्तरापुरती मर्यादित राहिली नाही, तर २०१२ पासून त्यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली. राज्य कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत त्यांनी किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यासाठी मोलाचे योगदान दिले. किशोरवयीन आरोग्य केंद्रांचे स्वरूप कसे असावे, त्यांचे पर्यवेक्षण कसे करावे आणि जास्तीत जास्त युवकांना याचा लाभ कसा मिळेल, यासाठी त्यांनी आरोग्य शिक्षण साहित्य विकसित केले. लोहयुक्त गोळ्यांची यशस्वी अंमलबजावणी, मानव विकास कार्यक्रम, आणि मासिक पाळी संवर्धन योजना अशा अनेक महत्त्वाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे केंद्र शासनाने महाराष्ट्राचा अनेकवेळा गौरव केला आहे.

महिनाभरात कमी होईल पोट मांड्यावर वाढलेले वजन! सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ चिमूटभर पदार्थ

कोविड-१९ च्या भीषण जागतिक संकटात डॉ. कमलापूरकर यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करताना पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत त्या नियोजनात व्यस्त असत. रत्नागिरीत पहिला कोविड रुग्ण आढळला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना धीर दिला आणि प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थिती हाताळली. स्वतःचे सहकारी बाधित झाले असताना त्यांना स्वतः फोन करून धीर देणे, त्यांना योगासने आणि चांगल्या आहाराचा सल्ला देणे, ही त्यांच्यातील संवेदनशील नेतृत्वाची ओळख आहे. दुसऱ्या लाटेत तरुणांचा मृत्यू होताना पाहून त्यांना आलेले वाईट अनुभव असोत किंवा बेड शिल्लक नसताना रुग्णाची सोय करून त्यांना जीवनदान दिल्याचे सकारात्मक प्रसंग असोत, डॉ. कमलापूरकर यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात आपली कर्तव्यनिष्ठा जपली.

सध्या त्या राज्यस्तरावर जन्म-मृत्यू नोंदणीसाठी उपमुख्य निबंधक आणि उपसंचालक या जबाबदार पदावर कार्यरत आहेत. नागरिकांना जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र सहजरीत्या उपलब्ध व्हावे, यासाठी त्या अहोरात्र प्रयत्नशील आहेत. सध्या शासकीय रुग्णालयात जन्म झाल्यावर मातेला घरी सोडतानाच प्रमाणपत्र देण्याची सोय राज्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने १ ऑक्टोबर २०२३ पासून सुधारित जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम देशभर लागू केला असून, महाराष्ट्रातही नवीन CRS REVAMPED PORTAL द्वारे २४ जून २०२४ पासून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यात आली आहे. नोंदणी विनामूल्य असून ती २१ दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे, याबद्दल त्या सतत जनजागृती करत आहेत. जन्म मृत्यू प्रमाणपत्र नागरिकांना वेळेत मिळेल यासाठी त्या प्रयत्नशील असणार आहेत.याशिवाय गुलियन बार सिंड्रोम याचे व्यवस्थापनही व याची धुरा त्यांनी सांभाळली आहे.अशा या कर्तबगार महिला अधिकाऱ्याच्या कार्याचा गौरव करणे, हाच खऱ्या अर्थाने महिला दिनाचा सन्मान ठरेल.

Appendix झाल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये होतात असह्य वेदना, अपेंडिक्स फुटू नये म्हणून करा घरगुती उपाय

Web Title: International womens day 2026 passion for duty and vow of public service dr babita kamalapurkars inspiring journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • womens day

संबंधित बातम्या

ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊसचं बांधकाम पूर्ण नाहीच! MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका, पैसे रिफंड करण्याचे आदेश
1

ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊसचं बांधकाम पूर्ण नाहीच! MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका, पैसे रिफंड करण्याचे आदेश

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?
2

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेच्या 24 व्या हफ्त्याबाबत आली सूचना, हे काम लवकर करा, नाहीतर अडकतील पैसे
3

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेच्या 24 व्या हफ्त्याबाबत आली सूचना, हे काम लवकर करा, नाहीतर अडकतील पैसे

Foreign Banks : विदेशी बँकांचा ग्राहकांना मोठा दिलासा! व्याजदर कपातीत आघाडीवर; RBI बुलेटिनमध्ये खुलासा
4

Foreign Banks : विदेशी बँकांचा ग्राहकांना मोठा दिलासा! व्याजदर कपातीत आघाडीवर; RBI बुलेटिनमध्ये खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.