देवगड तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी व खालची कदमवाडी यांना जोडणारा ‘अन्नपूर्णा’ नदीवरील साकव (लोखंडी पूल) कोसळला असून स्थानिक ग्रामस्थ या साकवाची डागडुजी करीत असतानाचही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. साकव (लोखंडी पूल) कोसळल्यामुळे बाईतवाडी व कदमवाडी या दोन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. या भागातील नागरिकांना आता नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून मार्गक्रमण करावे लागत आहे.