गेल्यावर्षी “सिंधुदुर्गचा राजा”च्या चरणी निलेश राणे हे निवडणुकीमध्ये निवडून यावेत असा नवस कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर भक्तांच्या हाकेला सिंधुदुर्ग राजा पावला आणि निलेश राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांचा हा नवस आज ६५ ग्रॅम सोने आणि अर्धा किलो चांदीमिश्रित “सोन्याचे पाऊल” अर्पण करून फेडण्यात आला. ही प्रतिष्ठापना शहरातील प्रतिष्ठित डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते करण्यात आली.कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेली १७ वर्ष राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून होत आहे. यावर्षी या गणेशोत्सवाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे.