सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला बचतगटांना अधिक सक्षम करण्यासाठी नवी योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत बचतगटांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर मार्केटिंग, ब्रँडिंग आणि पॅकेजिंगसाठीही प्रत्यक्ष मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी महिन्याभरात एक समिती स्थापन केली जाणार असून, तिच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा उभी करण्याचा पुढाकार घेतला जाणार आहे.






