डिसेंबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध सहशालेय उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू असून, विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरत आहे. नियमित अभ्यासाचा ताण बाजूला ठेवत वनभोजन, शैक्षणिक सहली, क्रीडा सप्ताह, वार्षिक स्नेहसंमेलन आणि गॅदरिंग अशा उपक्रमांमुळे शाळा परिसरात उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनच नव्हे तर संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त, सहकार्य आणि जीवनकौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत आहे. मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहलीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून शिक्षण अधिक आनंददायी बनत आहे, असे शिक्षक वर्गाकडून सांगण्यात येत आहे.