सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पहिल्या जत्रेची सुरुवात कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथून होते. आवळेगावचे ग्रामदैवत श्री नारायण मंदिरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आवळेगाव येथे श्री नारायण मंदिर हे ब्रम्हा, विष्णु आणि महेश्वर यांचे एकत्रित देशातील एकमेव मंदिर आहे. या जत्रोत्सवात कोकणची लोककला दशावतार सादर केली जाते. तसेच मालवणी खाजा, चहा आणि कांदा भजी यांचा जत्रेस येणारे भक्त आस्वाद घेतात.