अजित दादा गेले अन आर आर आबांच्या कुटुंबात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली. आबांच्या पश्चात अजित दादा हे पाटील कुटुंबियांचे आधारवड होते. पण आता यापुढं वडीलधारी म्हणून अजित दादांचं मार्गदर्शन लाभणार नाही. हे दुःख पचवणं आमच्यासाठी खूप कठीण आहे. असं दुःख पुन्हा आमच्या वाट्याला येईल, असा स्वप्नात ही विचार केला नव्हता. आता भविष्यात आम्हाला अजित दादांची पदोपदी उणीव भासेल. कंठ दाटून आलेल्या आबांच्या कन्येनं या भावना बोलून दाखवल्यात. आर आर आबांच्या पश्चात त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि कन्या स्मिता पाटीलच्या पालकत्वाची जबाबदारी अजित दादांनी स्वीकारली अन हयात असेपर्यंत ती त्यांनी निभावली. रोहित पाटलांच्या राजकीय जीवनात तर स्मिता पाटलांच्या शैक्षणिक ते वैवाहिक आयुष्याच्या निर्णयात ही अजित दादांनी पुढाकार घेतला आणि आबांच्या पश्चात जी पोकळी निर्माण झाली ती अजित दादांनी भरुन काढली. पण आता दादा ही सोडून गेलेत, त्यामुळे वडीलकीचं मार्गदर्शन आणि आपुलकी यापुढं मिळणार नाही. हे विचार स्मिता पाटलांच्या मनाला अजून ही पचनी पडेनात. आधी आबा आणि आता वडीलधारी अजित दादा गेल्यानं पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झाल्याचं सांगताना स्मिता पाटीलचे डोळे भरुन आले…