Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election : शोकाच्या सावलीत जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; पुण्यात बदलत्या समीकरणांची नवी चाचपणी

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय वातावरण अचानक बदलले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2026 | 12:11 PM
शोकाच्या सावलीत जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; पुण्यात बदलत्या समीकरणांची नवी चाचपणी

शोकाच्या सावलीत जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; पुण्यात बदलत्या समीकरणांची नवी चाचपणी

Follow Us
Close
Follow Us:
  • शोकाच्या सावलीत जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी
  • पुण्यात बदलत्या समीकरणांची नवी चाचपणी
  • दोन दिवसांत जिल्हा स्तब्ध
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय वातावरण अचानक बदलले आहे. आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिकार यांचा गदारोळ थांबला असून, गेल्या दोन दिवसांत जिल्हा जणू स्तब्ध झाल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे प्रचाराची दिशा आणि मतदारांची मानसिकता दोन्ही बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

 

महानगरपालिका निवडणुकांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. त्याच आत्मविश्वासावर जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली होती. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर प्रचाराची धार काहीशी बोथट झाल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्या पदाधिकाऱ्यांची तिकिटे कापून नव्या चेहऱ्यांवर भर दिला आहे. शिवसेनेनेही जुन्नर, आंबेगाव आणि खेडमध्ये ताकद वाढवत निवडणुकीला रंगत आणली होती; पण शोकाकुल वातावरणामुळे प्रचाराची रणधुमाळी तात्पुरती थंडावली आहे.

भोर तालुक्यात राष्ट्रवादीतून बंडखोरी उफाळून आली आहे. माजी सदस्यांची तिकिटे कापल्याने त्यांनी अपक्ष किंवा अन्य पक्षांचा मार्ग स्वीकारला. त्याचवेळी भाजपमध्येही काही ठिकाणी अंतर्गत नाराजी दिसून येते. राजगड आणि दौंड तालुक्यांत राष्ट्रवादी-भाजप अशी सरळ लढत होत असून, शिरूरमध्ये उमेदवारीवरून बंडखोरीचे सूर उमटले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढवत असल्याने काही इच्छुकांनी शिवसेना व इतर पक्षांकडे मोर्चा वळवला आहे.

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणी कुटुंबांतर्गत आणि भावकीतील थेट लढती. भोर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, दौंड, इंदापूर तसेच मुळशी-हिंजवडी परिसरात नातेसंबंधातील उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय नव्हे, तर वैयक्तिक प्रतिष्ठेचीही बनली आहे.

मंगळवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात पक्षांना अपयश आले असून, त्याचा थेट परिणाम निकालांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शोकाच्या वातावरणात होत असलेली ही निवडणूक पुणे जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती दिशा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The death of ajit pawar has suddenly changed the political atmosphere of the entire pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • ajit pawar plane crash
  • ZP Election 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.