राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची धुरा घेणार आहेत. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर खरतर महाराष्ट्र सुन्न झाला होता. पण अजितदादांनी राज्याला दिलेली विकासाची दिशा चुकवून चालणार नाही, या भावनेतूनच राज्यात शासकीय आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते… वर्षा निवासस्थानी बैठक झाली, आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या निमित्तानेच जाणुन घेऊया सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास कसा आहे? त्यांचे प्रारंभिक जीवन कसे होते?