ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनच्या NDPS पथकाने मोठी आणि धडक कारवाई करत गुन्हा रजिस्टर क्रमांक 46/2026 अंतर्गत तब्बल 13 किलो 500 ग्रॅम MD (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला आहे. या जप्त केलेल्या ड्रग्जची बाजारातील अंदाजे किंमत 27 कोटी 21 लाख 77 हजार 750 रुपये इतकी आहे. ही कारवाई मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून चालणाऱ्या आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटवर करण्यात आली असून, या कारवाईमुळे मोठे नेटवर्क उघडकीस आले आहे.मुंब्रा पोलीस स्टेशनच्या NDPS पथकाने केलेली ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असून, त्यामुळे अमली पदार्थ तस्करांचे मोठे षड्यंत्र उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.