Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार

टिटवाळा येथे रक्ताने माखलेली उबेर कार आढळल्यानंतर उलगडा झाला. कार चालक नासीर अन्सारी याचा मृतदेह सापडला असून इंजिनिअरिंग विद्यार्थी आदर्श भालेराव याच्यावर हत्येचा आरोप आहे. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 09, 2026 | 11:05 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • टिटवाळ्यात रक्ताने माखलेली उबेर कार आढळल्याने खळबळ
  • कार चालक नासीर अन्सारी बेपत्ता असल्याने संशय निर्माण
  • तपासात चालकाचा मृतदेह सापडला
ठाणे: टिटवाळामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्ताने माखलेली कार टिटवाळामध्ये आढळून आली. या कारचा चालक बेपत्ता असल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आणि तपासाला सुरुवात केली. या गाडीच्या चालकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. आता चालकाची हत्या कोणी केली? हा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी याच उत्तर शोधायला सुरुवात केली तर धक्कदायक प्रकार समोर आला. पोलिसांनी इंजिनिअरिंगच्या विध्यार्थ्याला अटक केली आहे. त्याने हत्या का केली? जाणून घ्या…

नेमकं प्रकरण काय?

टिटवाळा येथील गोवेली रोडवर रक्ताच्या दागाने माखलेली एक उबेर कार आढळून आली होती. टिटवाळा पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास करीत होते. टिटवाळा पोलीलांसह ठाणे एलसीबी देखील तपास करीत आहे. ठाणे एलबीसीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने हा तपास सुरु केला.

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप; पती फरार

पोलिस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांच्या पथकाने उबेर कंपनीची ही कार असल्याने राेड मॅप आणि शेवटचा प्रवासी कोण आहे? याचा शोध लावला. तपासात पोलिसांना माहिती मिळाली की आदर्श भालेराव नावाच्या व्यक्तीने ही गाडी पुण्याला जाण्यासाठी बुक केली होती. आदर्श हा इंजिनिरिंगच्या द्वितीय वर्षाला आहे तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. त्यासाठी त्याने उबेर कार बुक केली. गाडी चालक नासीर अन्सारी आला. त्याने प्रवासी आदर्शला घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.

गाडी गणेश खिंडीजवळ आली असता चालक नासीर याने गाडी थांबविली. नासीरने चाकूचा धाक दाखवून आदर्शकडे पैशाची मागणी केली. तुझ्याकडे असलेले पैसे दे, असं तो म्हणाला. यावेळी आदर्शने त्याला प्रतिकार केला. यात दोघात जोरदार झटापट झाली. या झटापटीत नाशीरच्या हातीतील चाकू आदर्शच्या हाती आला. आणि तो नासीरच्या गळ्याला लागल्याने नासीरचा गळा चिरला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हत्या करण्याचा हेतू नव्हता, मात्र…

नासीरचा मृतदेह तिथेच टाकून आदर्शने उबेर गाडी टिटवाळ्याला आणली. गाडी टिटवाळा गोवेली रस्त्यावर टाकून तिथून तो पळून गेला. आदर्शचा नासीरची हत्या करण्याचा हेतू नव्हता. मात्र त्याच्याकडून हा गुन्हा घडला.

नासिरला पैश्याची गरज होती

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता हे लक्षात आले की, नासिरला पैश्याची गरज होती. त्याने चार पाच जणांकडून पैसे मागितले होते. पोलिसांनी आदर्शला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना टिटवाळा परिसरात उघडकीस आली.

  • Que: मृत व्यक्ती कोण आहे?

    Ans: उबेर चालक नासीर अन्सारी याचा मृतदेह पोलिसांना सापडला.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आदर्श भालेराव याच्यावर हत्येचा आरोप आहे.

Web Title: Thane crime blood stained car found investigation reveals shocking details of uber drivers murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: ‘कार्यक्रम ओके’ कॉलने उलगडलं हत्याकांड; प्रियकरासोबत पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
1

Beed Crime: ‘कार्यक्रम ओके’ कॉलने उलगडलं हत्याकांड; प्रियकरासोबत पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

Virar Cirme: कॅमेरा झूम केला अन् समोर आलं धक्कादायक दृश्य; डोंगराळ भागात झाडाला लटकलेला मृतदेह
2

Virar Cirme: कॅमेरा झूम केला अन् समोर आलं धक्कादायक दृश्य; डोंगराळ भागात झाडाला लटकलेला मृतदेह

Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना
3

Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना

Hingoli Crime: निर्दयी कृत्य! पाच दिवसांच्या बाळाला झुडपात टाकून पळ काढला; पोलिसांचा तपास सुरू
4

Hingoli Crime: निर्दयी कृत्य! पाच दिवसांच्या बाळाला झुडपात टाकून पळ काढला; पोलिसांचा तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.