आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबर दरम्यान २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. आगरी समाजाच्या साहित्य, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक वैभवाचे दर्शन घडवणारा हा महोत्सव यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. महोत्सवादरम्यान आगरी समाजाच्या परंपरागत कलांचे दर्शन, लोकनृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक चर्चासत्रे आणि पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. खाद्यप्रेमींसाठी आगरी खाद्यसंस्कृतीची चव चाखण्याची सुवर्णसंधी महोत्सवात उपलब्ध होणार आहे. विविध खाद्यपदार्थांची स्टॉल्स, समाजाच्या इतिहासाचे प्रदर्शन आणि युवकांसाठी विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संधी देणारी ही पर्वणी असल्याचे आयोजकांनी सांगितले.