नवी मुंबईतील खांदा कॉलनी येथे एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज विविध मुद्द्यांवर सरकारला जोरदार टोला लगावला. मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा पेटून उठत असताना त्यांनी लवकरच दिल्लीत मराठा समाजाचे देशव्यापी अधिवेशन घेणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, अलीकडे समोर आलेल्या कथित कटप्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “सापडलेल्या तीन आरोपींनी आम्हाला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचे नाव घेतले आहे.” हे आरोप तपासले जावेत, तसेच “ते खोटं बोलत असतील तर त्यांची नार्कोटेस्ट करा, पाहिजे तर आमचीही करा,” असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात राजकारण न करण्याची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली.