ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे सोलापुरातील एका वकील बांधवांच्या केस संदर्भात न्यायालयात आले होते यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले, एका दहशतवादी खटल्यातील आरोपीच्या सुटकेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ज्या पुराव्यांवरून शिक्षा सुनावली, तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकले नाहीत, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.ज्या पुराव्यांच्या आधारावर मुंबई सत्र न्यायालय शिक्षा ठोठावते, तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची? हा प्रश्न त्यांनी विचारला. कायद्याच्या विश्लेषणात चूक झाली की तपास यंत्रणेने चुकीचे पुरावे गोळा केले, याचे ‘पोस्टमार्टम’ योग्य वेळी होईल, असे ते म्हणाले. “परंतु आज आरोपीची मुक्तता होणे गंभीर आहे,” असे सांगत, सरकार याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
.