मतचोरीच्या गंभीर प्रकरणाविरोधात महाविकास आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या १९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.अलीकडच्या काळात मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीच्या तक्रारी वाढत चालल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याविरोधात लोकशाही वाचविण्यासाठी आणि जनतेच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ता नितेश कराळे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.या मोर्चात जवळपास 10 हजारांच्या वर महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.