विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची राज्यात आलेली सत्ता पाहता इतर पक्षांच्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी शिंदेगट आणि भाजपात प्रवेश केला आहे, .याचदरम्यान सध्या राजन साळवींच्या पक्षप्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जाते. त्यात त्यांनी आपण नाराज नाही. पक्ष बदलणार नाही असे त्यांनी म्हंटलं होतं. त्यावर विनायक राऊत म्हणाले की, राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावले आहे. विधानसभा निवडणूक वेळी लांजा किंवा राजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या. पण त्या त्यांनी नाकारल्या होत्या. राजन साळवी उद्धव ठाकरे यांना कधीही फोन करून बोलू शकतात. राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. राजन साळवी पक्षाशी कायम प्रामाणिक राहतील.