चिमुकल्या मगरीला सिंहाच्या कळपाने घेरलं... वेदनेने कळवळत राहिला पण जंगलाच्या राजांनी चावून चावून खाल्लं; Video Viral
जंगलात शिकारीचा थरार दिसणे काही नवीन गोष्ट नाही. इथे जगायचं असेल तर शिकार ही करावी लागणारच. जंगलाचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे तर पाण्याचा राक्षस म्हणून मगरीला संबोधले जाते आता हे दोन शिकारी जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा दृश्य थरारकतेने भरलेले असतेच. पण सध्याच्या व्हिडिओमध्ये मात्र चार सिंहांनी मात्र शिकारीचा चांगलाच डाव रचल्याचे दिसून आले. एकट्या चिमुकल्या मगरीला पाहून सिंहांचा कळप त्याला जंगलात घेरतात आणि मगरीच्या पिल्लाला चावून चावून त्याचा फडशा पडून टाकतात. मगरीचं पिल्लू स्वतःला सिंहाच्या विळख्यातून सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण अखेर त्याचा शेवट लिहिलेलाच असतो… चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक छोटी मगर सिंहांच्या विळख्यात अडकली असून सर्व सिंहांनी तिला एकत्रितपणे घेतल्याचे यात दिसून येते. मगर लहान असल्याने ती सिंहांशी लढू शकत नाही आणि याचाच फायदा घेत सिंह तिच्यावर हल्ला करतात. मगर अजूनही आपला जीव वाचवण्यासाठी धडपडू पाहते, सिंहावर हल्ला करते, पण संपूर्ण सिंहाच्या काळपासमोर तिचं काहीही चालत नाही आणि सर्व सिंह एकत्र मिळून तिला चावून चावून खातात. अखेर व्हिडिओच्या शेवटी सिंहाच्या कळपाचा विजय होतो आणि मगरीला पराभूत व्हावे लागते. शिकार जंगलाच्या आयुष्याचा भाग असला तरी हे दृश्य मात्र आता युजर्सच्या डोळ्यात पाणी आणत आहे. मगरीच्या पिल्लाचा निर्दयपणे झालेला हा शेवट अनेकांना भावुक करत आहे.
— Damn Nature You Scary (@AmazingSights) August 27, 2025
जंगलाचा Video करायला गेला, समोर आलं भयानक सत्य; अंगावर येतील काटे, सापडली ‘नरभक्षक जमात’
हा व्हायरल व्हिडिओ @AmazingSights नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पिल्लासोबत वाईट झाले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांनी मिळून हल्ला केला म्हणून तो हारला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला त्याच्यासाठी वाईट वाटत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.