
श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच... दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral
हिंदू धर्मात दुग्धाभिषेकाला फार महत्त्व आहेत, अशात अलिकडेच व्यक्तीने कोणत्या देवी-देवताच्या मूर्तीला नाही तर चक्क गंगां नदीला दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने शअर केला जात असून यातील दृष्ये पाहून आता यूजर्स चांगलेच भडकले आहेत. देशात गरीबी वाढत असताना लोक मात्र श्रद्धेच्या नावावर अन्न वाया घालवतात आणि असेच दृष्य व्हिडिओतही घडताना दिसले. व्यक्ती दुधाचा एक मोठा टँक अभिषेकाच्या नावाखाली गंगेत वाहवत होता आणि याचवेळी काही गरीब मुली भांड घेऊन ते दूध आपल्या भांड्यात पडतंय का याचा प्रयत्न करताना दिसून आल्या. यातूनच आपल्याला दोन दृष्यांचे एकत्रित दर्शन घडते जिथे व्यक्ती श्रद्धेच्या नावाखाली दूध गंगेत फेकताना दिसतो तर याचवेळी गरीब मुली पोटाच्या भुकेसाठी ते दूध वेचताना दिसतात.
एक श्रद्धालु गंगा जी में दूध विसर्जन कर रहा है वहीं कुछ गरीब बच्चियां अपने बर्तन लेकर आईं और दूध लेने लगीं। लेकिन…. pic.twitter.com/nvW2zTWo35 — Abhimanyu Singh (@Abhimanyu1305) January 21, 2026
व्हिडिओ समोर आल्यानंतर, अनेकांनी त्याचा संबंध परिस्थितीच्या वास्तवाशी जोडला. दैनंदिन जीवनात किती गोष्टी अविचारीपणे फेकल्या जातात. श्रद्धेच्या नावाखाली आपण कितीतरी गोष्टी देवाला अर्पित करतो पण भुकेल्यांसाठी मात्र आपल्या हातातून साधं अन्नही दिलं जातं नाही. हा व्हिडिओ @Abhimanyu1305 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो खूप वाईट माणूस आहे. जर मुलांनी दूध प्यायले असते तर त्याला जास्त पुण्य मिळाले असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरेरे.अशा लोकांना कोणीतरी थांबवा.एक छोटी मुलगी समोर भांडे घेऊन उभी आहे. पण अंधश्रद्धा म्हणते की नाही, पाण्यात दूध ओतल्याने तुम्हाला पुण्य मिळेल.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “गंगा माता सर्व पाहत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.