(फोटो सौजन्य: Instagram)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वातावरण भक्तीमय झालं आहे. घराघरांत आरत्या, मंत्र आणि भजनांच्या गजरात बाप्पाचं आगमन मोठ्या थाटात होत आहे. भक्तगण आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करण्यासाठी फुलं, फळं आणि विविध नैवेद्य अर्पण करत आहेत. पण याच भक्तिभावाच्या दरम्यान एक मजेशीर आणि मिश्कील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. गणेशोत्सवात का कसं कुणास माहित पण एकदा तरी उंदराचे दर्शन हे घडतेच. उंदीर म्हणजे मूषक हे गणपतीचे वाहन आहे अशात गणेशोत्सवात त्याचे दर्शन फार शुभ आणि भाग्याचे मानले जाते. व्हिडिओतही मूषकराजांचे दर्शन घडल्याचे दृश्य दिसून आले आहे.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवलेला नैवेद्याचा वडा एक उंदीर अगदी शांतपणे आणि चतुराईने पळताना दिसून येत आहे. गणेशाची मूर्ती आणि त्याच्यासमोर ठेवलेला चौरंग… यावरच बाप्पाचं नैवेद्याचा ताट ठेवलेलं असत आणि याच वेळी चौरंगाखालून गुपचूप एक गोंडस उंदीर वर डोकावतो आणि क्षणाचाही विलंब न करता ताटात ठेवलेला मेदूवडा उचलून तिथून पसार होतो. ही संपूर्ण घटना घरातील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात टिपली आणि हा क्षण सोशल मीडियावर शेअर केला. इंटरनेटवर शेअर होताच हा व्हिडिओ लाखोंनी पाहिला आणि गणेशोत्सवाच्या उत्सवात आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक उंदराच्या या चोरीची चांगलीच मजा घेत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
जंगलाचा Video करायला गेला, समोर आलं भयानक सत्य; अंगावर येतील काटे, सापडली ‘नरभक्षक जमात’
हा व्हायरल व्हिडिओ @kalyani9919 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बाप्पाला भूक लागली असावी, म्हणून आपल्या वाहनाला नैवेद्य आणायला पाठवलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “”गणपतीच्या घरी उंदीर म्हणजे शुभ संकेत… पण वडा चोरणारा उंदीर तर थेट भक्तांचं मनोरंजन करत आहे!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “याचा अर्थ गणेशाने नैवेद्य मंजूर केला आहे”. हा व्हिडीओ हेच सांगतो की, भक्तीच्या या सणात हास्याचाही तितकाच मोठा वाटा आहे. उंदराचा हा किस्सा केवळ मजेशीर नाही, तर गणेश भक्तांच्या श्रद्धेचं आणि त्यांच्या बाप्पावरच्या नात्याचं जिवंत उदाहरण आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.