पापाच्या परीला स्कुटीवर पाहताच हत्तीचा कळप भीतीने लागला कुडकुडू, घाबरून मागे पळाले अन् पाहून सर्वांनाच आलं हसू; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. इथे फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या सर्वांच्या मनोरंजनाचे काम करत आहे. व्हिडिओमध्ये जंगलातील विशालकाय हत्तीचा कळप चक्क स्कुटीवर बसलेल्या मुलीला बघून घाबरताना दिसून आला आहे जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला तर काहींना हसूच फुटलं. हत्ती सारखा प्राणी इतक्या सध्या गोष्टीला घाबरत आहे हे पाहून सर्वच अचंबित झाले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले.
काय घडलं व्हिडिओत?
वाय्राल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक मुलगी स्कूटीवर जात आहे. यादरम्यान, हत्तींचा एक संपूर्ण कळप तिच्यासमोर येतो. आता मुलगी सुरुवातीला घाबरते, पण दुसरीकडे स्कूटीवर बसलेल्या मुलीला पाहून हत्तींचा कळप देखील घाबरलेला यात दिसून येतो. हत्तींचा कळप पळत पळत पुढे जात असतो पण स्कुटीवरील मुलीला पाहताच ते थांबतात, दोन पाऊले मागे जातात आणि मग काहीवेळ थांबून पुढे जाऊ लागतात. ही क्लिप पाहून असे वाटते की हत्ती स्वतःच त्या मुलीला घाबरला आहे, ज्यामुळे लोकांनी या व्हिडिओची चांगलीच खिल्ली उडवली आणि हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली.
Even elephants get scared when they see a girl riding a scooter. 😅#GirlPower #Elephants pic.twitter.com/Oa5oRif0N6
— ಸನಾತನ (@sanatan_kannada) September 8, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @sanatan_kannada नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते स्त्रियांचा आदर करतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “महिला गाडी चालवत आहे हे पाहून त्यांना भीती वाटत असावी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सुरक्षितता पहिली रे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.